जुळले प्रेमाचे नाते - भाग-३२

(13)
  • 10.7k
  • 1
  • 4.6k

या तिघी तर चांगल्याच दचकल्या... "काय मूर्ख आहे ती हर्षल. अरे अस प्रेम हिसकावून मिळत का..! ते मुळात दोघांच्या मनात असावं लागतं." प्रिया तर चांगलीच चिडली होती. मागून अभि आणि वृंदाने ही सुरात सूर मिसळले.. मी तिघींना शांत केलं..."अरे, तुम्ही आता चिडू नका.. झालं ते कधीच. आणि प्रेमात माणसाला नाही कळत आपण चुकीचं वागत आहोत की, बरोबर.. त्याला फक्त हवं असत ते प्रेम... आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्यावर केलेलं प्रेम. तसच काहीस हर्षुच होत." मी एक स्माईल देत समजावलं. तेव्हा कुठे तिघी शांत झाल्या. "अग पण एवढं झालं तरीही काही बोलली नाहीस मला.." अभि जरा रागातच बोलली. "मॅडम तुम्ही नाशिकला होतात. शिफ्ट