भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १६)

  • 6k
  • 2.3k

आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. " कोण आहोत आपण... कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न... या सर्वामुळे पुन्हा आला समोर... कोण असतील माझी माणसं, कुठे असतील.. काय नातं असेल पावसाचं आणि माझं... " माझा गणू ", ... माझाच आहे कि कोणा दुसऱ्याचा... आणि तो चेहरा, सतत आठवण्याचा प्रयन्त करतो मी.. कोण असेल ती, काय अस्तित्व असेल माझं.. " स्वतःशीच विचार करत होता आकाश. दूरवर नजर गेली त्याची. या डोंगरावरच्या मिट्ट काळोखात आग दूरवर दिसत होती. कुठेतरी दूर डोंगरावर अशीच कोणीतरी आग पेटवली असावी. हे दोन डोंगर एकमेकांपासून खूप दूर होते. या दोघामध्ये पसरलं होतं विस्तीर्ण जंगल... गावे आणि