कादंबरी - जिवलगा .. भाग - ८

(32)
  • 26k
  • 2
  • 18.4k

कादंबरी - जिवलगा ... भाग - ८ वा . ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------- मावशीच्या घरी येऊन आता नेहाला सहा महिने झाले होते . सुरुवातीच्या दिवसातील काही आठवणी , इथे सेटल होण्यास लागणारा उशीर ,याचेच विचार नेहाच्या मनात येत असत. मधुरिमाच्या सोबतीने इथल्या वातावरणात रुळण्यास तशी तर तिला खूप मदत होत होती . एका अर्थाने मधुरिमामुळे तर तिचे हे नवे आयुष्य -फार अडचणी न येता सुरळीत सुरु झाले होते . इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी मावशी आणि काकांच्या हॉस्पिटल मध्ये असण्याने खरे तर नेहाला मधुरिमा सोबत राहावे लागले ,ते तिच्या पुढच्या दृष्टीने खूपच उपयोगाचे ठरत होते. साधारण दोन-तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही ..त्यादिवशी ..मावशी आणि काका