प्रितिलता - एक परिसस्पर्श - 1

  • 13.3k
  • 4.1k

पुर्वी लोक एक-एकटे फिरत होते.नंतर ते एकत्र राहू लागले.समाज निर्माण झाला.जे शिकले त्यांनी प्रगती केली.तो समाज उच्च स्तरावर पोहचला.पण अशिक्षित लोक स्वतःची आणि पर्यायाने समाजाची प्रगती करू शकले नाहीत.त्यापैकीच एका समाजातील शाम आणि शंकर.एका खेडे गावात हजार-पंधराशे लोक राहत असतील.गावात शाळा सातवी पर्यंत होती.गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती.शेती गावातून दोन-तीन किलोमीटर अंतरावर असल्याने कांही समाजाने शेतातच घरं बांधली.गावातून बाहेर शेतात राहतात त्या घरांच्या समुहाला 'वस्ती' म्हणतात. शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना वस्तीवरून शाळेत दोन-तीन किलोमीटर अंतर चालून जावं लागायच.शाम आणि शंकर हे दोन मित्र होते.इयत्ता- तिसरीचा निकाल लागल्यानंतर उन्हाळी सुट्टी लागली.उन्हाळी सुट्टी नंतर चौथीचा वर्ग चालू झाला.पण गावापासून दूर राहीलेल्या अशिक्षित पालकांना काय