इतनीसी बात.

  • 5.5k
  • 2.2k

इतनीसी बात.... डेंटीस्टच्या वेटींग रूममधे माझा नंबर येण्याची मी वाट पहात बसलो होतो. टाईमपास म्हणून हातात मोबाईल घेतला.बाईकवरून जाताना फोन वाजलेला समजला नव्हता,दोनदा कुणाचे तरी कॉल येऊन गेले होते.दोन्हीही नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधे नव्हते म्हणून त्यातल्या एकाला उलट कॉल केला.एक रिंग वाजेपर्यंतच समोरून उत्तर आले.... "हॅल्लोss कोण?""अरे काय साहेब, अर्धा तास तुम्हाला ट्राय करतोय, कुठे आहात तुम्ही?"मला समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखता आला नव्हता... "कोण बोलताय आपण?""अरे ओळखलं नाही का,मी साळवे बोलतोय, मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय, कुठे आहे तुम्ही? "आमच्या कंपनीतला फारसा माझ्या संपर्कात नसलेला साळवे नावाचा अधिकारी बोलत होता."या माणसाचं माझ्याकडे असं काय अर्जंट काम असावं बरं..." मी