जुळले प्रेमाचे नाते - भाग-३०

(17)
  • 10.3k
  • 4
  • 4.6k

आम्ही निघालो होतो... निशांत गाडी चालवत होता आणि मी बाहेरचा निसर्ग अनुभवत होते. त्या गोबऱ्या गालाच्या काळ्या ढगांनी त्या सूर्याला आपल्या कवेत लपवुन टाकलं होतं. पण तो सूर्य ही किती शहाणा.., तो पण बरोबर ढगांच्या मागुन स्वतःचं डोकं वर काढु बघत होता... त्याची सोनेरी किरणं त्या ढगांच्या मागुन सर्वत्र पसरली होती... काही पक्षी ग्रुप करून फिरत होते. दुतर्फा झाड आणि त्यातून नागमोडा निघालेला रस्ता. मी खिडकी अजून ही ओपन ठेवली होती. छान वाटत होतं. आम्ही जात असता मला मधेच एक माळरान दिसलं आणि तस मी निशांतला गाडी थांबवायला सांगितली."निशांत.., गाडी थांबव..." माझ्या अचानक आशा बोलण्याने तो जरा गडबडला आणि गाडी बाजुला