प्रतिबिंब - 11 - अंतिम भाग

(14)
  • 5.4k
  • 2.2k

प्रतिबिंब भाग ११ अचानक शेवंता अक्राळविक्राळ रुपात आरशात दिसू लागली. तिचा हात बाहेर आला आणि जाईच्या गळ्याला पकडायला पुढे झाला. पण तिला गळा पकडता येईना. "फॅन निर्जीव आहे शेवंता. त्यावर अधिकार गाजवणे सोपे. काही अनीष्ट शक्तीही तुला साहाय्यभूत झाल्या असतील. पण सुजाण मनाला कह्यात घेणे फार सोपे नव्हे. शक्ती वाया घालवू नकोस. ह्या अहंकाराने बराच उत्पात माजवला आहे. आता पुरे.”फट्कन ती दिसायची बंद झाली. “आता, मी तुझ्या मनाला, योग्य मार्गावर घेऊन जाणार आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे. जशी तू या सर्व उत्पाताला निमित्तमात्र ठरलीस तसाच माझाही सहभाग निमित्तापुरताच आहे, हे मी जाणून आहे. मी माझ्या जीवाचंच