तोच चंद्रमा.. - 13

  • 4.9k
  • 1.8k

१३ भेट ब्रुनीची.. सात अाठ दिवस गेले मध्ये. आॅफिसच्या कामाचा डोंगर उभा समोर. इतक्या वर्षांत अकाउंटचे उंट कसे हाकावेत याची माहिती नसलेल्या कुणी मेन्टेन केलेली बुक्स. त्यातून हवी ती माहिती काढून तिची व्यवस्था लावणे कर्मकठीण. त्यामुळे ती शिस्त लावेतोवर मान मोडून कामाला पर्याय नव्हता. आणि माझ्या आवडीचे काम ते, त्यामुळे मी तसा खूश होतो. मी सारे हिशेब सांभाळण्यात सारे विसरून गेलो की काय असे वाटले एका क्षणी. राॅबिनशी पण जास्त बोलणे नाही नि ब्रुनीबद्दलही फारसा विचार नाही. रात्री येईपर्यंत थकायला होई नि मी जास्त विचार न करता ताणून देई. बिचाऱ्या राॅबिनशीही फारसे बोलणे झाले नव्हते.. त्यामुळे त्याला काय