भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १४)

  • 9.9k
  • 2.7k

" excuse me.... आज काय उपवास आहे का.. जेवणात काय fruits खायचे का... " अमोलने या दोघींनी आणलेल्या फळाकडे पाहत comment केली. " काय पाहिजे होते... ऑर्डर देयाची ना आधी... " सुप्री वेडावत बोलली. आजकाल, मूड बदलायचं बटन सापडलं होतं तिला. काही क्षणापुर्वी डोळ्यातलं पाणी पुसरणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली. " काहीही चाललं असतं मला .. तिखट पाहिजे होतं जरा.. " अमोल बोलला तसा तिला त्यांच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच. " आहे ते खा... नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू... कशी असतात माणसं... " सुप्री हसत म्हणाली. ----------------- X -----------------------