निघाले सासुरा - 2

  • 11.8k
  • 7.6k

२) निघाले सासुरा! आपल्या खोलीत पलंगावर पडलेल्या छायाच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. एक- एक नकाराचे प्रसंग तिच्या मनात रुंजी घालत होते. या ना त्या कारणाने तिला मुले नकार देत होती. त्यादिवशी सकाळीच पंचगिरींचा फोन खणाणला. हातातील वर्तमानपत्र बाजूला सारुन फोन उचलून पंचगिरी म्हणाले, हॅलो, मी पंचगिरी बोलतोय... अरे, मी देविदास बोलतोय... आज कशी काय आठवण झाली बुवा? पंचगिरींनी काहीशा आनंदात विचारले आपल्या छायासाठी माझ्याकडे एक ठिकाण आहे, सांगू का? अरे, असे का विचारतोस? सांग ना... आपल्यासोबत देशपांडे होता, तुला आठवत असेल. त्याचा एकुलता एक मुलगा इंजिनिअर असून तो लग्नाचा आहे. सांगतोस काय, ही तर आनंदाची गोष्ट आहे. देशपांडे आपला चांगला मित्र होता. त्याचा मुलगा निश्चित