आला श्रावण मन्भावान भाग ८ - अंतिम भाग

  • 7.1k
  • 2.6k

आला श्रावण मनभावन भाग ८ श्रावणातला रविवार या दिवशी सूर्यपूजा केली जाते श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे. ह्या व्रताच्या देखील दोन कथा आहेत. राणूबाई ही सूर्याची पत्नी, तिची पूजा ह्या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिने पश्चात्तापदग्ध होऊन आदित्य राणूबाईची पूजा केल्यावर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा