१२ तोच चंद्रमा नभात! घरी आलो तर आई वाटच पाहात होती. उशीर झाला रे? हो ना! अगं हा राॅबिन आला होता आॅफिसात. त्याच्या बरोबर बागेत गेलो.. गप्पा मारत बसलो तर थोडा उशीर झाला. असू देत. तुझे बाबा आज बाहेर गेलेत. त्या मून चायनाच्या मून इंडिया काऊन्सलेटमध्ये. मग तिकडे उशीर झाला तर कदाचित उद्या सकाळी येतील. आणि तू आलास ते बरे झाले.. पुस्तक लिहून झालेय माझे एकदाचे. पहिला ड्राफ्ट. वाच एकदा. मग अजून सुधारेन.. वा! बघू.. वाचतो लवकरच. जेवून घे आधी नि मग.. राॅबिन .. यस मॅडम.. डिनर मॅडम. हुं.. अंबर थकलेला दिसतोय .. एरवी राॅबिन काही न काही