जुळले प्रेमाचे नाते - भाग-२८

(14)
  • 10.5k
  • 1
  • 4.8k

आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल च नाव होतं.., "ड्रीम हाऊस". आम्ही आत जाताच निशांतने रिसेप्शनवर चौकशी केली असता एकाच रूम असल्याचं कळलं. त्यामुळे निशांतने रूम बुक केली. आज आम्हाला एकाच रूममध्ये ऍडजस्ट करावं लागणार होत. ती दुसऱ्या मजल्यावरची शेवटची रूम होती. ती देखील हनीमून स्पेशिअल.. काय करणार दुसऱ्या हॉटेल मध्ये ही जागा नसेल तर. म्हणून आम्ही जास्त विचार न करता आमच्या रूममधे गेलो. त्यांनी विचारला असता आम्ही बाबांना कॉल लावून दिला. कारण वय लहान असल्याने आम्हाला ते देत नव्हते. पण नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे बाबांनी समजावलं तेव्हा त्यांनी आम्हाला रूम दिली. लिफ्टमध्ये मी, निशांत आणि एक वेटर सोबत आलेला.