भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १२)

  • 5.3k
  • 2.1k

समोर हिरवं -हिरवं गवत.. अगदी ढोपरापेक्षा हि उंच... जमिनीवर तरी तेच होतं सगळीकडे... आणि समोर... बरोबर समोर , आणखी एक डोंगर दिसतं होता... परंतु थोडा दूर होता. त्याच्या आजूबाजूला पांढरे ढग ,प्रवास करत होते. त्याचं वरचे टोक तेव्हढं दिसतं होतं. सारे ढग त्याच्या बाजूने जात होते... पांढरी शुभ्र नदी जणू काही... त्याला चिटकून , तर कधी त्याच्या माथ्याला स्पर्श करत पुढे निघाले होते. सईला समोर काय आहे त्यावर विश्वास नव्हता. आकाश एका जागी उभा राहिला. सईचे बाकी मित्र पटापट फोटो काढत होते. पण सई ... अजूनही ती भानावर आली नव्हती. समोर आहे ते खरं