कादंबरी - जिवलगा ... भाग - ७

(37)
  • 27.4k
  • 20.2k

धारावाहिक कादंबरी - जिवलगा ... भाग -७ वा . ले - अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------- सुधामावशीच्या घरासमोर गाडी थांबली .मधुरिमा म्हणाली.अहो, नेहाकाकू , मावशीचे घर आली बरे का ..आपण उतरावे .. मी डिकीमधले समान घेते , तो पर्यंत तुम्ही थांबा हं ! नेहकाकू ..! हे नेहाकाकू -नेहाकाकू ऐकून नेहा चांगलीच वैतागून गेली होती .या मधुरिमाला आता घरात गेल की चांगलेच बजावून विचारलेच पाहिजे की- हे नेहाकाकू -नेहाकाकू काय लावलाय सारख ? मी ऐकून घेते आहे.म्हणून पुन्हा पुन्हा तेच म्हणते आहे . गाडीतून उतरल्यावर नेहाने आजूबाजूला पाहिले .. फक्त बंगल्यांचीच अशी ही छोटीशी कॉलनी असावी,गेटच्या बाहेर मोकळ्या जागेत मोठा बोर्ड दिसत होता ..त्यावर