ओळखपत्र

  • 15.9k
  • 3.7k

°° ओळखपत्र °° सायंकाळचे सात वाजत होते. विजया आणि अनिल हे दोघे पतीपत्नी कार्यालयातून घरी परतले होते. शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोघेही आनंदी होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा अजितही खूप खुशीत होता. अजित त्याच्या आजोबांसोबत शनिवारी सकाळी आत्याकडे जाणार होता. आत्याकडे राहणाऱ्या आजीला भेटायला मिळणार म्हणून अजितचा आनंद गगनात मावत नव्हता. "अजित, माझी बॅग भरून तयार आहे. तू तुझी बॅग कधी भरणार आहेस?" आजोबांनी विचारले. "माझी बॅग आई भरून देणार आहे. आई, कधी देणार आहेस?" "देते.