व्यसन

  • 18k
  • 1
  • 3.6k

मला एक विचित्र व्यसन लागलेले आहे. बरे व्यसन म्हटले की बऱ्याच वेळेस लोकांना ते लगेच लक्षात येते, काही वेळेस लोकं टीव्ही वरील विविध व्यसनमुक्तीचे प्रोडक्ट वापरायला लावतात, काही वेळेस त्या व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखलही केलं जातं. पण जी व्यसने दिसत नाहीत त्याला कोण काय करणार? या एका व्यसनामुळे अजून पर्यंत माझे लग्न ठरू शकलेले नाही. माझी आई माझ्या या व्यसनापायी सूनमुख न पाहता देवाघरी गेली. पण अजूनही माझ्या या व्यसनावर मला काही उपाय करता आलेला नाही. खूप इच्छा आहे हो माझी... पण... तो दिवस रविवारचा होता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे परत एकदा माझ्यासाठी मुलगी पाहण्याचा प्रोग्राम आखला गेला होता. मुलगी