चांदणी रात्र - 19 - अंतिम भाग

(23)
  • 8.9k
  • 1
  • 2.1k

राजेशला आता सर्वकाही आठवत होतं. अलिबागची ट्रिप, ते अद्भुतरम्य जंगल, जंगलात राहणारे आदिवासी, रिवा, गरू, वाघ आणि अगदी जगदीश यादव सुद्धा. “मला माहितीये तुला वृषालीची फार आठवण येते.” रिवा राजेशला म्हणाला. एवढा वेळ जुन्या आठवणींमध्ये बुडालेला राजेश वृषालीचं नाव ऐकताच भानावर आला. तो रिवाला म्हणाला, “रिवा मला माहितीये तुझ्या कडे खूप गूढ शक्ती आहेत. काहीही कर पण माझ्या वृषालीला पुन्हा जिवंत कर. मी नाही जगु शकत तिच्या शिवाय.” राजेश अगदी काकुळतीला येऊन बोलत होता. “माणूस एकदा मेला की परत येत नाही.” रिवा म्हणाल. “तूच असं म्हणालास तर मी काय करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी अशक्य