मैत्रीण भाग 3

  • 11k
  • 4.4k

मैत्रीण भाग 3 पाऊस आजही सुरू होता. रिमझिम बरसणारा पाऊस हा सर्वांनाच हवा हवासा वाटणारा असतो. आणि मीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ' अरे... छत्री घेऊन जा..' असे घरातून मतोश्रींचे सांगणे आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी तसाच सरीवर सरी अंगावर घेत कॉलेज ला निघालो. कालच्या प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा झाला होता. त्यामुळे लेक्चर करण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून थेट लायब्ररीत जाऊन वाचत बसलो. वाचनात गुंग असतानाच मागून पाठीवर जोराचा धपाटा पडला. तो नित्या होता. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं मी त्याला काही बोलणार इतक्यात त्यानेच बोलायला सुरुवात केली, "Hi Buddy कसा आहेस आणि कुठे होतास, लेक्चर का नाही आलास.