जुळले प्रेमाचे नाते - भाग-२६

  • 10.1k
  • 1
  • 5k

"लेट तुझ्यामुळे होईल माझ्यामुळे नाही कळलं.. तुम्हा मुलींना लागतो वेळ.." थोडा कुस्तीत निशांत बोलला. तस मी त्याच्या पाठीत धपाटा घातला.. "आई ग.., लागलं ना हनी-बी." स्वतःची पाठ चोळत तो ओरडला.. "एवढं काही नाही लागत.., नाटकी नुसता.." मी उठुन स्वतःच्या रूमध्ये जाता जाता बोलले. मी आईला बोलवून घेतलं कारण तीच माझी आज तय्यारी आणि हेअरस्टाईल करून देणार होती. मी आधी ड्रेस घालून घेतला. नंतर केसांची आईने छान हेअरस्टाईल केली. समोरून थोडे हेअर बाजुला काढून कर्ल केले. मागे राहिलेल्या केसांचा बन बनवुन काही केसांना कर्ल करून तिने पिनअप करून त्यावर सिल्वर आणि डायमेंटचे हेअर एक्ससर्सरीज लावले. आज तिनेच माझा मेकअप हिंद द्यायचं ठरवल