प्रोत्साहन

  • 15.9k
  • 4k

* प्रोत्साहन * काही वर्षांपूर्वी शिक्षक या पदावरून निवृत्त झालेले जोशीकाका दिवाणखान्यात रविवारचे वर्तमानपत्र वाचत बसलेले असताना त्यांच्या हरिनाम संकुलात राहणारा, चौथ्या वर्गात शिकणारा राम नावाचा मुलगा त्यांच्या घरी आला. त्या संकुलातील तीन मजल्यावर सहा कुटुंबं राहात होती. त्यापैकी एक कुटुंब म्हणजे जोशीकाका आणि काकू! जोशीकाका-काकूंनाही लहान मुलांची खूप आवड असल्यामुळे संकुलातील मुले त्यांच्या अवतीभवती राहात असत. जोशीकाका दररोज सायंकाळी संकुलाच्या वाहनतळावर सर्व मुलांना एकत्र जमवून 'परवंचा' घेत असत. संस्कार गीते,बडबडगीते, छोट्या बोधकथा त्यांना सांगत असत. सोबतच मुलांनी शाळेत शिकलेल्या कविता आणि गोष्टी मुलांना सांगायला लावत. कुणी त्यास 'संस्कार वर्ग' म्हणे तर कुणी 'बाल आनंद मेळावा' असे म्हणत असे.