एडिक्शन - 11

  • 8.8k
  • 3.6k

माझी कथा एकूण तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ..माझ्या मनाची दशा ती फार उत्तम रीतीने समजून घेऊ शकली होती ..तिनेही आयुष्यात भरपूर दुःख सहन केले असल्याने ती माझ्याशी समरस झाली होती ..ती डोळ्यातले अश्रू पुसत मला पुन्हा एकदा म्हणाली , " निशा नाही बोलत का आता तुझ्याशी ? " आणि मी शांत होत म्हणालो .. , " बोलतो ग !! आताच काही दिवसाआधी तिने मला फोन केला होता ..तू मामा होणार आहेस ही खूषखबरी द्यायला ...योगेशला देखील तिने याबद्दल आधी सांगितलं नव्हतं ..आई होण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर त्याक्षणी प्रत्यक्ष जाणवत होता ..ती कितीतरी वेळ एकटीच बोलत होती आणि मी