मला काही सांगाचंय... - २२

  • 7.5k
  • 1
  • 3k

२२. एकांत स्वतःशी तिचा असा संवाद सुरु असता ती त्या भावविश्वात मग्न झाली ... कितीतरी विचारांचे बाण प्रत्येक क्षणाला तिचं मन विचलित करू लागले ... मनात अचानक आलेले विचार घर करू पाहत होते पण दुसऱ्याच क्षणी आणखी पुढे काय लिहिलं असणार ? असं तिच्या मनात आलं आणि तिने समोर वाचायला सुरुवात केली ... रविवार दिवस होता ... बराच वेळ पुस्तक वाचून नोट्स काढून घरच्या घरी जाम कंटाळा आला होता , मग काय सायकल घेऊन निघालो सुजितला भेटण्यासाठी पण मनात ती नव्हतीच कारण सकाळपासून फक्त आणि फक्त अभ्यास करत जवळ जवळ अर्धा जास्त दिवस निघून गेला होता ... तर म्हटलं चला