आला श्रावण मनभावन भाग ५

  • 8.9k
  • 1
  • 2.7k

आला श्रावण मनभावन भाग ५ श्रावणी शुक्रवार हा श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस आहे. या दिवशी जिवतीचा कागद लावून पूजा केली जाते . जिवतीच्या चित्रात लेकुरवाळी सवाष्ण दाखवलेली आहे .तसेच पुराणातील नरसिंह व इतर कथांची पण चित्रे आहेत . आपल्या मुला बाळांच्या सुखासाठी व दीर्घ आयुष्यासाठी हे शुक्रवार केले जाते . महालक्ष्मीला पुरणावरणाचा नेवेद्य दाखवला जातो . पुरणाच्या दिव्यांनी तिची आरती केली जाते . सवाष्ण बाईला महालक्ष्मी समजून जेवायला घातले जाते व नंतर तिची ओटी भरली जाते . संध्याकाळी जवळच्या बायका हळदी कुंकवाला बोलावून त्याना फुटाणे व दुध साखर प्रसाद म्हणून दिला जातो . याची कहाणी अशी आहे आटपाट नगर