कादंबरी - जिवलगा ...भाग-६

(33)
  • 47.3k
  • 23.3k

धारावाहिक कादंबरी- जिवलगा... भाग- ६ वा ले- अरुण वि. देशपांडे ------------------------------------- सकाळी सहा वाजता पुण्याला पोंचणारी बस काल रात्रीच्या गोंधळामुळे तब्बल तीन तास उशिराने का होईना पोंचली खरी एकदाची. सगळ्यांनी "पोंचलो रे बाबा एकदाचे ",असे सुटकेचे निश्वास सोडीत, आपापल्या भागात सोडणारे ऑटो शोधण्यास सुरुवात केली.नेहाने स्वारगेटला जाण्यासाठी रिक्षा केली,ठाणे, मुंबईसाठी इथूनच बसने जाणे योग्य ",अशी सूचना मावशीने अगोदरच देऊन ठेवली होती. नेहाचे फ्रेश होऊन झाले, चहापाणी करून झाल्यावर एकदम छान वाटले, काल रात्रीच्या प्रवासातल्या प्रोब्लेमचं भूत आता नक्कीच आपल्या मानगुटीवरन उतरले आहे, असे वाटून, तिला खुप हायसे वाटले.ठाणे जाणारी बस लागली, आणि नेहा तिकीट घेऊन बस मध्ये बसली.पाच- दहा मिनिटानंतर