जुळले प्रेमाचे नाते - भाग-२५

(13)
  • 11.3k
  • 2
  • 4.8k

दहा-पंधरा मिनिटांनी मी तिला कॉल केला आणि विश केलं.... "हॅपी बर्थडे टू यु माय डिअर हर्षु..." "थँक्स प्राजु..., मला माहित होत की, तु कॉल करशील म्हणून बाजूलाच ठेवला होता मोबाईल. जस्ट केक कापला. भाई घेऊन आला होता." तिची अखंड बडबड चालू होती. मग निमंत्रण देऊन तिने कॉल ठेवला. तशी मी झोपेच्या अधीन झाले. एवढी झोप जी आज आली होती. सकाळच्या अलार्मने माझी झोपमोड केली... "चांगल्या स्वप्नांच्या वेळी हा अलार्म बरा वाजतो.." स्वतःशीच बडबडत मी फ्रेश होण्यासाठी गेले. आज मी आणि निशांत लवकरच कॉलेजमधुन निघणार होतो. बर्थडे हा लोणावळ्यात होणार होता. त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागणार होतं. मी तय्यारी करून कॉलेजमध्ये गेले.