आला श्रावण मनभावन भाग ४

  • 7.9k
  • 2.9k

आला श्रावण मनभावन भाग ४ श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी. भक्ती किंवा उपासना मनापासून केल्याने अगदी अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होतात. चांगले भाग्य येण्यासाठी बुधाची उपासना करावी, आणि कोणतेही चांगले काम सिद्धीस जाण्यासाठी अकरा पांढरे बुधवार करावेत. बुधवार हा महालक्ष्मीचा वार आहे. अकरा बुधवारी पांढरी फुले वाहून महालक्ष्मीची पूजा केली जाते . हे अकरा