भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ९)

  • 5.9k
  • 2.5k

कोमल , संजना ,सुप्री आणि मंडळी, शहरातून गावाकडे निघाली होती. काही तुटक माहिती आणि खूप सारा आत्मविश्वास घेऊन प्रवास सुरु झालेला. आता सकाळचे ८ वाजले आहेत, एका तासात पोहोचू , असा कोमलचा अंदाज. सुप्री गप्प, संजना तिच्या शेजारी झोपलेली. आणखी काही मंडळी इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत झोपलेलं बरं म्हणत निद्राधीन झालेली. अमोल मात्र भारी खुश होता. जाग आल्यापासूनच त्याचं "click... click... " सुरु झालेलं. बहुतेक बसच्या बाहेर दिसतं होतं तेच फोटो होते. गुपचूप १-२ सुप्रीचेही फोटो काढले होते त्याने. कॅमेरा तसा महागातला होता त्याचा. दूरवरचे फोटो सुद्धा स्पष्ठ दिसायचे. खुपचं फोटो क्लिक झालेले, नंतर