प्रतिबिंब भाग ८ शेवंता सावकाश स्टडीतून बाहेर आली. ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पायातल्या पट्ट्यांचे आवाज छूम छूम छूम..., जाई एकदम सावध झाली. बाहेर आली, तर शेवंता तिला ऑफिसच्या दारातून आत जाताना दिसली. धास्तावलेल्या मनाने जाई ऑफिसच्या दाराशी पोचली. यश आत होता. त्याने अंगातला शर्ट उतरवला होता. दरवाजाकडे त्याची पाठ होती. शेवंता त्याच्या अगदी जवळ उभी होती. नुसती. जराही हलली असती तरी त्याला स्पर्श झाला असता. आसुसलेल्या नजरेने ती त्याला पहात होती. जाई ओरडणारच होती, तेवढ्यात यश मागे वळला, "झालं तुझं मेडिटेशन? छान तंद्री लागली होती तुझी." जाईची क्षणभर नजर यशकडे वळली आणि तेवढ्यात शेवंता दिसेनाशी झाली. पण जाईला मात्र