प्रेमातील अविश्वास

  • 10.8k
  • 2.6k

नाथा मुंबईमध्ये एस.टी. डेपोत ड्रायव्हर होता.तो महिन्यातून एकदा-दोनदा घरी यायचा.पण त्याला घरातील वातावरण नेहमीपेक्षा काहीसे वेगळे वाटले.त्याला एक मुलगी होती.तीचं नाव जान्हवी.दोन दिवसांनंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली ती म्हणजे कधीही कॉलेज न चुकवणारी जान्हवी, दोन दिवसांपासून कॉलेजमध्ये गेली नव्हती.न राहून नाथाने जान्हवीला विचारले,"पोरी कॉलेजला का नाही जात?." "पप्पा...मी.... पप्पा..."जान्हवी पुढे काय बोलणार इतक्यात तिची आई बोलली,"पोरगी घाबरली आहे." "अगं रकमे.., नेमकं काय झालं ते तरी सांग."नाथा कासावीस होऊन म्हणाला. "अहो,कसं सांगू तुम्हाला."रकमा रडू लागली. नाथा वैतागून,"आता सांगतेय की हाणू टाळक्यात?." अहो, तीन दिवसांपूर्वी पोरगी घरी येत होती.वाटेत तिच्या समोर जीप गाडी येवून उभी राहिली.जीप गाडीतला एक जण तिला म्हणाला,"येतेस