बक्षिसाची किमया!

  • 14.3k
  • 4.1k

* बक्षिसाची किमया! * त्यादिवशी दुपारच्या सत्रात सातव्या वर्गावर शिकवत असताना एक पालक एका हाताने एका विद्यार्थ्याला ओढत आणत होता. सोबतच दुसऱ्या हातात असलेल्या छडीने त्याला मारत मारत आणत होता. मी त्या मुलाकडे पाहिले आणि मला आठवलं की, त्या मुलाला दररोज कुणी ना कुणी असेच रट्टे देत आणून सोडते. बरे,मुलगाही लहान नव्हता. सातव्या वर्गात शिकणारा म्हणजे चांगले बारा-तेरा वर्षाचे वय होते. शिवाय अंगापिंडाने मजबूत होता. शाळेत येण्याचा मात्र त्याला भरपूर कंटाळा होता. घरून कुणीतरी मारत आणायचे. शाळेत आला की, अगोदरच्या दिवशी आला नाही म्हणून शिक्षकही शिक्षा करत असत."अरेरे! काय झाले?" मी त्या दोघांकडे पाहून विचारले."काय व्हायचं? शाळेत येतच नाही." वैतागलेला