चांदणी रात्र - १८

  • 6.6k
  • 2k

जगदीश यादव हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ होती. जंगलाची पाहणी करण्यासाठी ते निघाले. बोटीत त्यांच्याबरोबर आणखी चार माणसं होती. त्यांनी गावातील लोकांनाही खूप आग्रह केला पण कोणीही यायला तयार झालं नाही. बोटीने ते पलीकडच्या बाजूला गेले. समोर दाट जंगल एखाद्या राक्षसासारखं दिसत होतं. जगदीश बोटीतून उतरले व जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांची पूर्ण देहबोलीच एखाद्या माजलेल्या रेड्यासारखी होती. चालण्यात तोरा होता. चेहेऱ्यावर मग्रुरी होती. बोटीतील दोन माणसं त्यांच्याबरोबर चालू लागली. दोन जण बोटीतच थांबले. बरच पुढं गेल्यावर त्यांना एका बाजूला ओळीने बांधलेल्या झोपड्या दिसल्या. रिवा त्याच्या झोपडीच्या दारातच बसला होता. त्याने जगदीश यादवला समोरून जाताना पाहिले. तो एकटा असता तर