आला श्रावण मनभावन भाग ३

  • 6.3k
  • 2.5k

आला श्रावण मनभावन भाग ३ मंगळागौरीची कथा अशी सांगतात . आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. पण “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही, असें म्हणून तो निघून जाई . ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” तिने अशी भिक्षा झोळींत घातली. गोसावीबुवाचा नेम मोडला. तो बाईवर फार रागावला. ‘मूलबाळ होणार नाहीं’ असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. गोसावीबुवांनी उःशाप दिला. ते म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्रं परिधान कर.