जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-२

(19)
  • 10.7k
  • 4.9k

जरा घाईतच मी ऑडीमध्ये घुसले.... ऑडीमध्ये आज परत तशीच गर्दी होती. मी निशांतला शोधत आत गेले.., पण तो काही दिसत नाही बघून जाणार होते की, ऑडीचा दरवाजामध्ये निशांत उभा होता. मी धावत त्याच्या जवळ गेले.. "अरे निशांत.., आपण कुठे करूया प्रॅक्टिस.?? इथे तर खुप गोंधळ आहे." मी जवळ जाऊन बोलले. "एक काम करू.. आपलं कॉलेज संपलं की माझ्या घरी जात जाऊया प्रॅक्टिसला टेरेसवर... तिकडे फक्त आपणच असु., म्हणजे कोणाचा दुसऱ्याचा त्रास नाही होणार." तो पूढे चालत बोलला. "आपण उद्यापासुन प्रॅक्टिस करूया तुझ्या घरी.. कारण आज मला शॉपिंगसाठी ही जायचं आहे." मी त्याच्या मागे चालत बोलले. त्याने माझ्याकडे बघत आपला हाताचा थम्ब