तोच चंद्रमा.. - 9

  • 5.3k
  • 2k

९ ब्रुनी! नव्या नोकरीचा पहिला दिवस! सकाळ सकाळी माझा खास टाय आणि जाकिट घालून आॅफिसात गेलो. कृष्णन माझी वाट पाहात असावेत. हॅलो यंग मॅन. वेलकम टू न्यू आॅफिस. लोढा आणि गुंदेचा बिल्डरच्या या आॅफिसात तुझे स्वागत आहे. आज आपला खास दिवस. वेलकम टू द न्यू एम्प्लाॅयी मि. अंबर राजपूत. एवढे बोलून त्यांनी बेल वाजवली. त्याबरोबर आॅफिसातून सारा स्टाफ येऊन उभा राहिला. त्यात हर्ली तर होतीच अाणि दोन मुलं नि चार मुली होत्या. बाकी सारे ह्युमनाॅईड्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले माझे. वेलकम स्पीच झाले. आॅफिसबद्दल नि कामाच्या पद्धतीबद्दल भाषणे झाली. मग समोसे आले.. चहा आला.. एक तास असा