तान्हाजी द अनसंग वॉरियर - अनुभव समीक्षा

(20)
  • 14.7k
  • 1
  • 4.2k

तानाजी द अनसंग वॉरियर अजय देवगण निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॊरियर चित्रपटाची नशिबानेच शनिवारी तिकिटं मिळाली आणि पाहण्याचा योग आला. चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्यांदा तिकिटाचे 100 नाही 200 नाही तर 1000 टक्के पैसे वसूल झाल्याचं समाधान मिळालं. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केलंय. 2016 साली अजय देवगण आणि टीमने चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. तब्बल साडे तीन चार वर्षे एकाच चित्रपटावर मेहनत करून भारतीय प्रेक्षकांसाठी एक भव्यदिव्य, अप्रतिम अशी ऐतिहासिक कलाकृती निर्माण केली आहे. त्यातही मराठी प्रेक्षकांसाठी आणि विशेष म्हणजे पुण्यातील प्रेक्षकांना तर पर्वणीच. कारण, सुभेदार तानाजी मालुसरे म्हटलं की कोंढाणा किंवा सिंहगड, आणि