आला श्रावण मनभावन भाग २

  • 7.6k
  • 3.2k

आला श्रावण मनभावन भाग २ यानंतर येतो मंगळवार या दिवशी मंगळागौर पूजन करतात . हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचार पूजा करतात. याला सर्व प्रकारची फुले व मिळतील तितक्या झाडांची पत्री अर्पण केली जाते . पत्री पूजा म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात