गोरी गोरी गोरीपान

  • 18.1k
  • 6.3k

■■ कविता कालची..शिकवण आजची! ■■ * गोरी गोरी पान... * माधवी शाळेतून घरी आली. नेहमीप्रमाणे तिची आई दीपिका दारात उभी नसल्याचे पाहून माधवीला आश्चर्य वाटले. दार उघडे होते. आई काय करते हे पाहावे म्हणून माधवी आवाज न करता घरात आली. तेव्हा तिने बघितले की, तिची आई डोळे लावून शांतपणे बसली होती. दूरदर्शनवर असलेल्या आकाशवाणी केंद्रावर लागलेले गाणे ऐकण्यात तल्लीन झाली होती. ती गाणे ऐकण्यात एवढी रंगून गेली होती की, माधवी येऊन तिच्या शेजारी बसल्याचेही तिच्या लक्षात आले नाही. गाणे ऐकताना तिचे डोळे बंद झाले होते. ओठ ऐकू