भटकंती.... पुन्हा एकदा (भाग ५)

  • 8.3k
  • 2.7k

" चला .. आम्ही निघतो... ती बॅग सापडली बसमध्ये, एका ठिकाणी अडकून बसली होती. म्हणून कळलं तुमचा माणूस गेला ते... ते सांगायला आलेलो. डेड बॉडी मिळाली तर कळवू. एक फोटो देऊन ठेवा त्याचा. " आकाशच्या वडिलांनी त्याचा फोटो आणला होता सोबत. देऊन टाकला. सगळे निघाले. सुप्री एका ठिकाणी तशीच उभी. " काका... मी येऊ का तुमच्या सोबत... " सुप्री त्या पोलिसांना उद्देशून बोलली. " कुठे ? " ," आकाशला शोधायला.. " ," काय वेड-बीड लागला आहे का तुम्हाला... महापूर आला आहे तिथे... "," प्लिज .. प्लिज... काका मला सुद्धा घेऊन चला... " सुप्री त्यांच्या पाया पडू लागली. " अहो मॅडम... काय तुम्ही हट्ट