श्यामची पत्रावळ ! 

  • 18.6k
  • 1
  • 6.9k

श्यामची पत्रावळ ! दुपारचे तीन वाजत होते. श्याम नुकताच शाळेतून परतला होता. आल्याबरोबर त्याने शाळेचे दप्तर टेबलवर ठेवले. आईकडे हसून बघत त्याने दप्तर उघडून एक पुस्तक काढले. ते पुस्तक आईच्या हातात देत श्याम म्हणाला, "आई, हे बघ मला हे पुस्तक बक्षीस मिळाले आहे." श्यामच्या हातातले पुस्तक घेऊन श्यामकडे कौतुकाने बघत आई म्हणाली, "अरे, व्वा! बक्षीस मिळाले. तेही सानेगुरुजींचे पुस्तक. अभिनंदन! पण बक्षीस कशासाठी मिळाले ते नाही सांगितले?" "आई,आज आमच्या शाळेत सानेगुरुजी वाचनमाला या संस्थेची माणसं आली होती.