भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १)

(12)
  • 18.7k
  • 1
  • 6.4k

सूर्यास्त होतं होता. ढगांची धावपळ सुरु होती घरी पोहोचण्यासाठी. खाली नदीचं विस्तीर्ण पात्र, गाढ झोपेत असावी अशी भासावी इतकी शांत होती ती. शेजारी असलेल्या वनात पक्ष्यांचे थवे दिसतं होते.... घरी परतलेले. सूर्याची किरणे झाडा-झाडात दिसत होती अजूनही .... काय फोटो होता तो. असं वाटतं होतं कि समोरच उभा राहून पाहत आहोत सगळे. " wow !!! amazing.... शब्दच नाहीत माझ्याकडे काय बोलू ते... means ... एवढं feel होते आहे ना हा फोटो बघून... " कोमलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लगेच तिने पुसूनही टाकलं. संजनाने सहानुभूतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. " होते असं.. जे जे हा फोटो