प्रतिबिंब - 6

  • 7.1k
  • 3.1k

प्रतिबिंब भाग ६ जाई एकदा एखाद्या विषयाच्या अभ्यासाला लागली की, इतकी एकाग्र होत असे की मग बाकी कोणतीच गोष्ट तिचे चित्त विचलित करू शकत नसे. तिने याच गोष्टीचा, शेवंताला आपल्या मनापासून दूर ठेवण्यासाठी वापर करण्याचे ठरवले. थोड्या वेळाने तिने मन एकाग्र करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एकीचा वापर करत, डोळे मिटून स्वस्थ पडून मन एकाग्रतेच्या सरावास सुरवात केली. काही वेळाने तिचा मनातल्या मनात प्लॅनही ठरला. या सर्व गोष्टींच्या असं आहारी जाऊन चालणार नव्हतं. आत्ता प्राथमिकता ही होती की लढायचं असेल तर शरीर, मन दोन्ही निरोगी आणि सुदृढ हवं. त्यासाठी व्यवस्थित दिनक्रम आखून घ्यावा लागणार होता. मंडळी देवदर्शनाहून परतली. नवी नवरानवरी आनंदात