तोच चंद्रमा.. - 8

  • 5.9k
  • 1.9k

८ इंटरव्ह्यू आठवडा उलटून गेला मध्ये. म्हणजे पार्टी नंतर. दोन तीन वेळा बाहेर गेलो मी. एकदा बागेत .. एकदा असेच भटकत.. नि काहीवेळा अख्ख्या रेसिडेंशियल काॅलनीत. उगाच वर्षा कुठे भेटतेय का ते पहायला. हे चूक आहे हे कळत होते मला पण वळत नव्हते. शेवटी मला एकट्याला गाठून राॅबिन ने कानउघडणी केली.. ब्रो, व्हाॅट आर यू अप टू? कुठे काय? मी जस्ट इकडे तिकडे हिंडतोय.. अंबर, डिअर, डोन्ट लाय टू मी. तू मला नाही फसवू शकत आणि स्वत:ला ही. हे बघ तुला नव्याने सुरूवात करावीच लागेल. ज्या गावाला जायचेच नाही त्याचे तिकिट काढतोच कशाला? ज्या गोष्टीचा लाॅजिकल शेवट माहित