जुळले प्रेमाचे नाते - भाग-२३

(18)
  • 10.4k
  • 1
  • 4.9k

असेच दिवस जात होते. माझी आणि निशांतची आता घट्ट मैत्री झाली होती. वाटायचा तेवढा ही वाईट आणि खडूस तो नक्कीच नव्हता. राग यायचा पण माझ्यावर नाही... खुप काळजी घेणारा असा होता निशांत... आजकाल प्रॅक्टिस ही बंद होती माझ्या पायामुळे. बाकी कॉलेज, भेटणं चालूच होत. उद्या रविवार असल्याने मी निशांतच्या घरी जाणार होते.. तस मी आजोबांना प्रॉमिस जे करून आले होते. आम्हाला नर्सरीमध्ये जायचं होतं. "निशांत.., तु येणार आहेस का उद्या आमच्यासोबत नर्सरीमध्ये..??" मी कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या विचारल.... "अरे यार.., मी तर पार विसरलो होतो. मला नाही जमणार वाटत, कारण मी बाहेर जाणार आहे कॉलेजच्या फ्रेंड्स सोबत." त्याने जरा नाखुषीनेच सांगितलं. मला