तोच चंद्रमा.. - 7

  • 5.5k
  • 2.1k

७ पार्टी! दोनएक दिवस गेले. बाबांचा रेड अॅलर्ट संपला एकदाचा. तिकडे आॅफिसात बसून कंटाळले म्हणावे, तर आले घरी तेव्हा एकदम खुशीत होते. काय अंबू.. अंबुजा सिमेंट .. हाऊ आर यू? बाबांची ही जुनी सवय होती.. अंबर नावाचा जमेल तितक्या पद्धतीने अपभ्रंश करायचे खुशीत आले की. कधी अंबुजा, कधी आंबोळी तर कधी अांबिल.. अंबाबाई .. अंबालिका.. कधी समानार्थी शब्दांनी मारायचे हाक.. ख.. आकाश.. नभ.. गगन.. स्काय वगैरे! असे झाले की समजावे, त्यांचा मूड चांगला आहे! मी काय.. मजेत आहे. इंटरव्ह्यूची तयारी करतोय. गुड. आज संध्याकाळी तयार रहा.. राॅबिन .. यस्सर.. अरे आज वेलकम पार्टी अाहे ह्या अंबीहळदीची. बी रेडी! यस्सर