कॉलगर्ल - भाग 11

(34)
  • 37.6k
  • 1
  • 24.3k

सकाळी डॉक्टरांनी काका-काकूंना discharge दिला. यश त्या सगळ्यांना घरी सोडून साईटवर गेला. बाकीची सगळी जबाबदारी जान्हवीनं सांभाळली. काका-काकूंची जेवणं, त्यांची औषधे, सगळं काम तिने काळजीपूर्वक केलं. काकूंना जान्हवीचा मोठा आधार होता. त्यांच्या तोंडात सारखं जान्हवीचं नाव होतं. यशने रात्री काका –काकुंचं त्यांच्या मुलाशी स्काईपवर बोलणं करून दिलं. काकूंनी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो आधी घाबरला, लगेच निघतो म्हणाला. पण यशने त्याला समजावलं. काकू ठीक असल्याचं सांगितलं. त्यानेही यशचे वारंवार आभार मानले.रात्री झोपताना यशने जान्हवीला जवळ घेतलं, तिचा हात हातात घेत म्हणाला, “आज किती काम केलंस, थकली असशील?”“हो. पण काकू सुखरूप आल्या याचं समाधान जास्त आहे.”“किती हिम्मत आहे तुझ्यात, तुला