5 तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते . पत्रकार व न्युज चॅनलवाले वेगळं , राजकीय नेते वेगळे आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती . खून झालेली जरी गुन्हेगार असले तरी न्यायव्यवस्थेला काही किंमत आहे का नाही असे पत्रकारांची बोंबाबोंब चालू होती . नेत्यांचं आम्हाला काहीही न विचारता लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल असे स्वतःच पत्रकारांना सांगत होते . तर सामान्य जनता वेगळ्याच मूडमधे होती . कोणी त्या खून करणाऱ्या सिरीयल किलरला सपोर्ट करत होती तर कोणी त्याला विरोध करत होते . एकंदरीत काय तर लवकरात लवकर तपास लागावा म्हणून आमच्यावरची दबाव आणला जात