जय मल्हार - भाग २

  • 13.6k
  • 6.4k

जय मल्हार भाग २ खंडोबा विषयी माहिती घेताना त्याच्या वेगवेगळ्या देवस्थानांची माहिती घेणे जरूरी आहे . महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी देवस्थाने प्रमुख अशी एकंदर अकरा आहेत. यातील काही ठिकाणी जिथे प्रत्यक्ष खंडोबाच्या जीवनातील घटना घडल्या त्या ठिकाणांना महत्व आहे . १) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे) ४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड) ९) मृणमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद). १) श्री क्षेत्र जेजुरी( पुणे ): जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे असे