कादंबरी- जिवलगा ... भाग - ४

(61)
  • 52.6k
  • 1
  • 30.4k

धारावाहिक- कादंबरी - जिवलगा ... भाग - ४ था .ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------ आज सुरु झालेला हा प्रवास अनेक अर्थाने नेहाच्या आयुष्याला नवे वळण देणारा ठरणार होता . आतापर्यंत घरातल्या माणसांच्या सोबत प्रवास करण्याची सवय असलेल्या नेहाला , पहिल्यांदा एकटीने प्रवास करायचा होता , नाही म्हणायला तिच्या गावाहून निघणारी ही बस असल्यामुळे , आज तिच्या सोबत असणारे प्रवासी खूप ओळखीचे नसले तरी ,बहुतेकांची तोंड ओळख नक्कीच होती. कारण ही तिच्या गावातलीच माणसे होती , आणि लेडीज -प्रवासी म्हणून आलेल्या मुली तिच्याच शाळेतल्या, कॉलेजमध्ये शिकलेल्या होत्या . यामुळे तसे भीतीचे दडपण मनावर येण्याचे काही कारण नव्हते.इतर सह-प्रवासी नेहाला जरी फारसे ओळखत नसले तरी त्यांना