जुळले प्रेमाचे नाते - भाग-२१

(24)
  • 10.4k
  • 5.2k

सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत माझी सकाळ मस्त फ्रेश झाली. लवकर उठुन मी तय्यार होऊन खाली आले.... "कशी आहे तब्बेत प्राजु..? बर वाटतंय ना.?" आईने नाश्ता बनवत विचारलं. मी हाताची तीन बोटं दाखवत छान अस करून दाखवत बाहेर येऊन डायनिंगवर बसले. बाबा पेपर वाचतच बोलले..., "मग परी कस वाटतंय..?? नसेल बर वाटत तर आज नको जाऊस कॉलेजला.." बाबा पेपरमधून डोकं वर काढुन बोलते झाले.... "बाबा आता छान वाटतंय मला. आणि तसही मी आज कॉलेजला नाही जात आहे. मी निशांत ला घेऊन बाहेर जाणार आहे." अस बोलताच बाबांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. किचनमधुन आईचा ही आवाज आला.. "कुठे जाणार आहात..??" "अग आई..., काल निशांतने माझी